पनवेल येथे वाहन चोरी करणारे २ गुन्हेगार गजाआड.

पनवेल येथे वाहन चोरी करणारे २ गुन्हेगार गजाआड.


प्रतिनिधी - अनिल काकडे सह सचिन श्रीवास्तव


नवी मुंबई :- पनवेल शहरात गाड्या चोरीचे प्रमाण वाढत होते त्याअनुषंगाने पनवेल शहर पोलिस तपास करत होते तपासादरम्यान गुप्त बातमीदार व तांत्रिकदृष्ट्या माहिती मिळाल्या नन्तर तुर्भे midc पोलिसांच्या मदतीने दोनीही आरोपीना तुर्भे येथून अटक करण्यात आली
अटक करण्यात आलेल्या आरोपिकडून सुमारे ४.लाख ३० हजार रुपयांच्या ४ दुचाकी ४ रिक्षा, त्याचबरोबर ह्या आरोपींनि पान टपऱ्या फोडून सिगरेट आणि अन्य पदार्थ चोरले होते ते सर्व जप्त करण्यात आले आहे तसेच आरोपीना हे गुन्हे करताना वापरले स्क्रू ड्रायव्हर पक्कड इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले दोनीही आरोपी पनवेल येथील असून


१. अशोक बाळकू उताले वय २० वर्षे


२.अभिषेक प्रकाश बोराडे उर्फ भटक्या वय २० वर्षे
या आरोपीना पनवेल शहर मध्ये ८ गुन्हे
कळंबोली १. तर तळोजा येथेही १ गुन्हा केला असे तपासादरम्यान उघड कबूल केले.
आरोपीना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने ३०-७-२०२० पर्यंत पोलीस रिमांड मध्ये ठेवण्याचे आदेश दिले.
सदर कामगिरी पोलीस आयुक्त संजय कुमार सह पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर पोलीस उपायुक्त अशोक दुधे व सहपोलिस आयुक्त अधिक गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली
सपोनि निलेश राजपूत उप निरीक्षक सुनील तारमळे पोह विजय आयरे नितीन वाघमारे, पोना प्रमोद शिंदे पंकज पवार नन्दकुमार माने, गणेश चौधरी, अमरादीप वाघमारे, म्हाळू आव्हाड, विवेक परासुर, यादवराव घुले, राजू खेडकर, सुनील गर्दनमारे या पथकाने वरील कामगिरी बजावली.