मंत्र्यांसोबत बैठकीला भलत्याच मुलांना नेतात, घुसखोरांवर कारवाई करा, मराठा आंदोलक तरुणांची मागणी

मुंबईतील आझाद मैदानातील आंदोलनात वेगळाच प्रकार समोर आला आहे. 11 दिवसांपासून मराठा आंदोलक आझाद मैदानात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र मंत्र्यांसोबतच्या बैठकीत आंदोलकांऐवजी वेगळ्याच मुलांना नेत असल्याचा आरोप आंदोलक तरुणांनी केला आहे.