धक्कादायक! पुण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न

महिलेवर वारंवार बलात्कार करणारा आरोपी अटक पूर्व जामिनावर सुटला, त्यानंतर या आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेनं याला विरोध केला म्हणून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला. पुण्याच्या भीमा कोरेगाव येथील हा धक्कादायक प्रकार आहे.